सोमेश्वरनगर प्रतिनिधी: विनोद गोलांडे
मूर्ती कारागीर गणेश मूर्तीवर अखेरचा हात मारण्यात व्यस्त आहेत; मात्र यावर्षी कच्च्या मालाचे वाढलेले भाव, वाढती मजुरी त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या किमतीमध्ये वीस ते पंचवीस टक्के भाववाढ होणार आहे. कारागीर रात्रंदिवस मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहराबरोबरच खेड्यापाड्यातही मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. तालुक्यासह सोमेश्वरनगर परिसरात गणेशोत्सवाची धामधूम व धावपळ सुरु झाली आहे. सोमेश्वरनगर परीसरातील मंडळे पाच फूट ते दहा फुटापर्यंत मोठी गणेशमूर्ती बुकिंग करत होती परंतु या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे गणेश प्रशासनाने गणेशोत्सव रद्द केले असल्यामुळे सर्व बाजारपेठ ठप्प झाली आहे. सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करता घरीच गणपतीची पूजा करून आपला सण साजरा करणार असल्याने गणपती विक्री मोठा फटका बसणार आहे असे मूर्ती कारागीर संजय कुंभार यांनी सांगितले.
यावर्षी गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, काथ्या, विविध प्रकारचे रंग, रंगीबिरंगी खडे यांच्या भावात २० ते २५ टक्के वाढ झाली असल्याने गणेश मूर्ती चढ्या भावात विक्री होण्याची शक्यता आहे
करोनाच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वरनगर ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून बहुतांशी विक्रेत्यांनी संपर्क द्वारे घरपोच मूर्ती देऊन आपली जास्तीची विक्री होण्यासाठी मार्ग अवलंबला असल्याचे सांगितले.