नागठाणे :-प्रतिनिधी
आपल्या पाच वर्षांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत गावाचा खर्या अर्थाने कायापालट करणारे कामेरी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच
सुंदर कल्याण घाडगे(आबा) यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये दि.23 रोजी सकाळी 9 ते 12 यावेत रक्तदान शिबीर तसेच ह.भ.प.शंकर महाराज माने(कुसवडे)यांचे किर्तन त्यानंतर स.11:30 पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे
तर रात्री 9 वाजता च़ांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीज फेम किर्तनकार ह.भ.प.भरत शिंदे(बाळासाहेब)यांचे किर्तन होणार असल्याची माहिती स्व.सुंदर आबा युवा मंच यांच्या वतीने देण्यात आली आहे