
महाराष्ट्र राज्याचे सहकार , पणन मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा नामदार बाळासाहेब पाटील साहेब यांचे विशेष प्रयत्नाने जलजीवन मिशन योजनेतून कराड – उत्तर विधानसभा मतदार संघातील उंब्रज ता . कराड येथे नवीन पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी रक्कम रूपये १८ कोटी २३ लाख व गोवारे ता.कराड येथे ७ कोटी ५० लाख मंजूर झाले आहेत . शुक्रवार दि . २५ फेब्रुवारी , २०२२ रोजी शासन निर्णय क्र . ग्रापापु २०२२ / प्र.क्र .२८६ / पापु -१८ ने नुकतीच या कामास प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे .
या नवीन पाणीपुरवठा योजनेमधून उंब्रज या निमशहरी गावास मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे . उंब्रज हे मध्यवर्ती गाव असून या ठिकाणी परिसरातील ग्रामस्थांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू राहते तसेच शाळा महाविद्यालयास विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती येत असतात , तसेच औषधोपचारासाठीही लोक येत असतात , तसेच आठवडी बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असतो . उंब्रज हे गाव मल्हारपेठ – पंढरपूर रस्त्यावरील प्रमुख गाव आहे . याठिकाणी पाणी योजना कालबाह्य झाली होती . त्यामुळे नवीन पिण्याच्या पाण्याची योजना करणे आवश्यक आहे . त्यासाठी ग्रामस्थ उंब्रज यांची सातत्याने मागणी नामदार बाळासाहेब पाटील यांचेकडे होती त्यास अनुसरून या कामास प्राधान्याने जलजीवन मिशन योजनेमध्ये समाविष्ट करून १८ कोटी २३ लाख निधी उपलब्ध करण्यात यश आले आहे . लवकरच या कामास प्रत्यक्षदर्शी सुरूवात होणार आहे .
तसेच गोवारे ता.कराड हे गांव कराड शहराच्या जवळचे गांव म्हणून प्रसिध्द आहे . पुरवठा योजना या गावाचे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे . याठिकाणी नवीन पाणी करणे आवश्यक होते . ग्रामस्थ गोवारे यांची नामदार साहेब यांचेकडे सातत्याने मागणी होती त्यामुळे या गावाचीही नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून त्यास ७ कोटी ५० लाख निधी मंजूर झाला आहे . लवकरच या कामास प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे . सदरच्या योजना मंजूर झालेमुळे ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी लवकरच मिळणार आहे . त्यामुळे ग्रामस्थ नामदार बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद देत आहेत .































