आंबेदरे सोसायटीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा चेअरमनपदी तानाजी मोरे तर, अमोल गायकवाड व्हा. चेअरमन
सातारा- सातारा तालुक्यातील आंबेदरे विकाससेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून सोसायटीवर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने झेंडा फडकावला. सोसायटीच्या चेअरमनपदी तानाजी मोरे तर, व्हा. चेअरमनपदी अमोल गायकवाड यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांचा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीचे संचालक शरद निकम, सुरेश पिलावरे, सिंधू मोरे, जयवंत आहिरे, भगवान बगाडे, बबई इथापे, जोतिराम मोरे, नामदेव चव्हाण, दत्तात्रय शिंदे, अनंता इथापे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रत्येक गावाच्या विकासामध्ये विकाससेवा सोसायट्यांच्या महत्वाचा भाग असतो. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळून उन्नती साधली जाते. आंबेदरे सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सभासदाभिमुख कारभार करून सोसायटीचे आणि गावाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.






















