कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विडणी ता. फलटण येथील ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीने अत्यावश्यक सेवा वगळता आज शनिवार दि ५ सप्टेंबर पासून 11 तारखे पर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सरपंच रूपाली अभंग, उपसरपंच नवनाथ पवार, मंडल अधिकारी जे.बी. कोंडके, श्रीराम सहकारीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, ग्राम विकास अधिकारी डी बी चव्हाण, पोलीस पाटील धनाजी नेरकर, डॉ. नयन शेंडे आदी उपस्थित होते.
विडणी गावची लोकसंख्या 15 हजाराच्या आसपास आहे. गावात कोरोन बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीने बैठक आयोजित करून वरील प्रकारे निर्णय घेतला आहे. गावातील दवाखाने व औषध दुकाने वगळता संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सकाळी 9 ते 2 या वेळेत भाजीपाला ,किराणा दुकाने व इतर सर्व दुकाने सुरू राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. याचे निवेदन फलटण उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आले आहे. गावात आतापर्यंत 29 कोरूना बाधित रुग्ण आढळले असून 18 जण बरे झाले आहेत . नऊ जणांवर सध्या उपचार चालू आहेत. दोघा जणांचा मृत्यू झालेला आहे.