कराड : असंख्य वारकरी संप्रदायाचे श्रध्दास्थान विठुरायाचा कार्तिक वारी सोहळा हा फार महत्वाचा आहे. जागतिक कोरोना संसर्ग रोगाच्या संकटामुळे मागील दोन वर्षापासून आषाढी सह अन्य यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्यास शासनाचे परवानगी नाकारली होती. परंतु यंदा दिवाळी नंतर आलेल्या कार्तिक वारीस शासनाने सर्व किरोना नियमांचे पालन करुन परवानगी दिली आहे. दिंडीतील सर्व वारकरी बंधू भगिनी, व माऊलींना कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर चे वाटप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल (दादा) शिंदे यांनी केले. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची दीपावली साजरी झाली. आज श्री क्षेत्र वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा, दिंडीचे प्रस्थान पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी झाले. आज दिंडी चे दर्शन घेउन, दिंडीला सुरुवात झाली. यावेळी ह.भ.प. रामचंद्र कदम (लोटांगणे महाराज) संप्रदायी ट्रस्ट, वाल्मिकी अध्यक्ष- अधिकराव साबळे, बाबुराव साळुंखे, चोपदार नारायण पाटील, अशोक पाटील, संपतराव साबळे, किशोर मोरे, विनोद बोरडे, लक्ष्मण कदम, भरत पाटील, सूरज जाधव, अथर्व साळुंखे उपस्थित होते.






















