इंडियन प्रेस क्लब या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने APB माझाचे पत्रकार राहुल तपासे यांच्यावरील भ्याड हल्लाप्रकरनी कराड शहर पोलिस ठाणेला दिले निवेदन.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :सातारा जिल्ह्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल तपासे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना कठोर शासन झालेच पाहिजे. अशी मागणी इंडियन प्रेस क्लब सातारा जिल्ह्याच्या कार्यकारिणीने कराड शहर पोलीस ठाणेला निवेदनाद्वारे दिली.
पत्रकार राहुल तपासे हे 30 मे 2022 रोजी पुणे बेंगलोर महामार्गावरून जात असताना समोरच्या गाडीमध्ये दारू पित बसलेल्या व्यक्तीकडे नुसतं बघितल्या च्या रागातून त्या गाडीतील तीन व्यक्ती नी संगणमत करून त्या त्यांची चारचाकी गाडी राहुल तपासे यांच्या गाडीला मागून जोरदार धडक देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा प्रकार इंडियन प्रेस क्लब चे केंद्रीय सदस्य सदाशिव खटावकर (माऊली) व जिल्हाध्यक्ष तन्मय पाटील यांना समजला. त्यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी संघटनेतर्फे केली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.

त्यामुळे पुन्हा एकदा “पत्रकार संरक्षण कायदा” नेमका कशासाठी ?हा प्रश्न या निमित्ताने उद्भवतो पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सदस्य सदाशिव खटावकर यांनी व्यक्त केले. तर या संदर्भात सर्व पत्रकार संघटनांनी रस्त्यावर उतरून या गोष्टींचा निषेध केला पाहिजे व पत्रकारांची एकजूट दाखवून दिली पाहिजे,असे परखड मत जिल्हाध्यक्ष तन्मय पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी इंडियन प्रेस क्लबचे केंद्रीय सदस्य सदाशिव खटावकर,जिल्हाध्यक्ष तन्मय पाटील, प्रसार माध्यम प्रमुख कैलास थोरवडे,तालुकाध्यक्ष अमोल टकले, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रमोद तोडकर, सोशल मीडिया कराडचे समन्वयक शरद गाडे, प्रियंका पाटील, सुहास कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते






















