महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
दिवंगत लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे 1920 ते 1969 यांना महाराष्ट्रातील जनता अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखते अतिशय गरीब व अनुसूचित जातीतील मातंग कुटुंबात जन्माला आलेल्या अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून कष्टकऱ्यांचा वेदनांना वाचा फोडली त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी प्रथा व परंपरा यांसारख्या वाईट चालीरीतींना संपवण्यासाठी प्रेरणादायी साहित्य लिहिले त्यांनी महिलावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्याचा प्रतिकार करण्यासाठी समाजाला दिशादर्शक साहित्य लिहिले त्यांच्या फकीरा या कादंबरीतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नायक फकीरा द्वारे इंग्रजांच्या जुलमी कायदा समाजाच्या नजरेत आणून दिला आहे त्यांच्या कादंबऱ्या 15 कथासंग्रह नाटक व पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा आहे त्यांचे साहित्य जगभरातील 27 भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी आहेत आपल्या साहित्यातून त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले आहेत ऑगस्ट 2002 साधी भारतीय टपाल विभागाने त्यांच्या समाज कार्याचा गौरव करण्यासाठी तिकीट प्रकाशित केले होते या थोर समाज सेवकांचे 2020 हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी समाजाच्या विविध स्तरातून होत आहे करिता आपण आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे व समाजाच्या भावनांचा आदर करावा ही विनंती
सदर निवेदन देताना खालील पदाधिकारी उपस्थित होते बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक मा. विजय काटरे ,बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष मा.संजय रुद्राक्ष , भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा .आनंदराव लादे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे जिल्हाध्यक्ष मा. किशोर थोरवडे, जिल्हा प्रचारक विनोद लादे ,कराड तालुका उपाध्यक्ष मा. नितीन गोतपागर , घिसाडी समाज संघटना तालुका अध्यक्ष मा.शिवाजी साळुंखे ,मुस्लिम क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक मा. सिकंदर भाई मणेर ,सामाजिक कार्यकर्ते मा.सलमान मुल्ला उपस्थित होते