प्रतिनिधी फलटण
फलटण तालुक्यातील साखरवाडी मध्ये असणाऱ्या दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल शाळेमध्ये शनिवार दिनांक ०६/०६/२०२२ रोजी शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला पर्यावरण दिनानिमित्त शाळेमध्ये मुलांनी व सर्व शिक्षकांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले शाळेच्या मुख्याध्यापक अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम यांनी मुलांना पर्यावरण विषयक माहिती दिली तसेच मुलांना झाडे लावल्याने होणारे फायदे व झाडांपासून मिळणारे सर्व उत्पादने याबद्दल माहिती देऊन मुलांना स्वतःच्या घरा जवळील परिसरात झाडे लावण्यासाठी सांगितले या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार,सविता जगताप, संध्या जगताप, पुनम शेलार,स्नेहल पवार, सुषमा गायकवाड उपस्थित होते






















