सोमेश्वरनगर प्रतिनिधी: विनोद गोलांडे
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने कसा साजरा करावेयाबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं जारी केल्या आहेत. त्यानुसार घरगुती गणपतीच्या मूर्तीवर दोन फुटांची मर्यादा तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीवर चार फुटांचे बंदनघालण्यात आली असल्याचे वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी करंजेपुल दूर क्षेत्रात झालेल्या गाव पोलीस पाटील यांच्या मीटिंगमध्ये सूचना करण्यात आल्या याप्रसंगी वडगाव निंबाळकर हद्दीतील येणाऱ्या गावांमधील पोलीस पाटील उपस्थित होते. शनिवार दि २२ रोजी गणेश चतुर्थी असून या दिवशी श्री गणेश मूर्ती स्थापना आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या परिसरातील गावांमध्ये नागरिकांना सूचना करून काळजी घेण्यास सूचना व मार्गदर्शन करावे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारनं केल्या आहेत. त्यानुसार घरगुती गणपतीच्या मूर्तीवर दोन फुटांची मर्यादा घालण्यात आली आहे. तसंच, गर्दीमुळं होणारा संसर्ग टाळण्यासाठी विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून घेण्याच्या सूचना गणेशभक्तांना करण्यात आल्या आहेत.ज्या गावांमध्ये कंटेनमेंट जोन आहे त्या गावांमध्ये घर गोरी घरगुती गणेश मूर्ती स्थापना करावे पण मंडळ गणेश मूर्ती स्थापनेला परवानगी नाही असेही सूचना करण्यात आलेसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या ऑनलाईनघेणे गरजेचे आहे.
उत्सवाचे मंडळाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असावे. सजावट करताना भपकेबाजी नसावी. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही याचीही ही नोंद मंडळाने घ्यावे असे बोलताना वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले