महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/ वडगाव निंबाळकर : बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र युवक अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या पुढाकाराने वडगाव निं. ता.बारामती येथे तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी विनोद ताराचंद चव्हाण(सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक), माधुरी दशरथ जाधव, निलेश बाळासो पोमणे, सुरज सुरेश मोरे (पोलीस उपनिरीक्षक) यांचा शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह, वृक्ष देऊन माजी महसूल आयुक्त शिवाजीराजे निंबाळकर व बहुजन हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सुनिल धिवार म्हणाले की लवकरच बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात बहुजन हक्क परिषदेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी ज्या मुला-मुलींची घरची आर्थिक परिस्थिती खुपच नाजुक आहे, अशा मुलांसाठी निवासी मोफत अभ्यासिका केंद्र चालु करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे स्वागत युवक अध्यक्ष अमोल गायकवाड व जिल्हाध्यक्ष संतोष डुबल यांनी केले. प्रास्तविक संघटनेचे प्रवक्ते अक्षय चाचर,सूत्रसंचालन अभिजीत हिरवे सर व निलेश आगम यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार पै. नानासाहेब मदने यांनी मानले. यावेळी सुजाता जाधव,कांचन काटे,अलका भंडलकर,तेजश्री भंडलकर,संजय साळवे,अजित भोसले,धनंजय खोमणे,दत्तात्रय खोमणे,भाऊसाहेब खंडागळे,मधुकर शिंदे,बाळासो जाधव,संतोष डुबल,सचिन साठे,निलेश रांगोळे,निलेश मदने,नितीन गायकवाड,उमेश गायकवाड,चांगदेव भंडलकर,सुरज खोमणे,अशोक चव्हाण,पांडुरंग घळगे,नंदकुमार जाधव,दादा निंबाळकर,अरविंद खोमणे,लक्ष्मण चव्हाण,लालासो खोमणे,सतिश साळवे,नागेश जाधव,भाऊसो आगम,गणेश रांगोळे,बापु दरेकर,दादासाहेब आगम,अभिजित साळवे आकाश वाघमारे,मंगेश खोमणे,तेजस जाधव,विशाल चव्हाण,छोटु जाधव,भुषण दरेकर,दिपक भंडलकर,उपस्थित होते.
[स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-या युवकांचा सत्कार करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.त्यांच्यासारखे यश इतरांनी मिळवावे हा हेतू या सत्कारा मागचा होता. नानासाहेब मदने- बहुजन हक्क परिषद युवक अध्यक्ष महाराष्ट्र]