कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर..
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत येथील टाऊन हॉल मध्ये जाहिर करण्यात आली. कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या उपस्थितीत वार्डनिहाय सोडत काढण्यात आली.त्यामध्ये ओबीसी आरक्षण वगळून अनुसूचित जातीच्या दोन जागा, अनुसूचित जमातीच्या दोन जागा व सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी 14 जागा आरक्षित असणार आहेत.13 जागा सर्वसाधारण गटासाठी खूल्या आहेत. एकूण 31 जागा असून वार्ड क्र.15 मध्ये तीन जागा असणार आहेत.वाॅर्ड क्रमांक 1 अ, 2 अ, 3 अ, 5 अ, 6 अ, 7 अ, 8 अ, 9 अ, 10 अ, 12 अ, 13 अ, 14अ ,15 ब, 15 क या जागा सर्वसाधारण महिलांसाठी असणार आहेत.तसेच वाॅर्ड क्रमांक 1 ब, 2 ब, 3 ब, 4 ब, 6 ब, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब,11 ब, 12 ब, 13 ब, 14 ब, या जागा सर्वसाधारण असणार आहेत.वार्ड क्र.4 अ व 11 अ- अनूसूचित जाती महिलांसाठीवार्ड क्र.5 ब व 15 अ अनूसूचित जाती साठीयादरम्यानआज चार वार्डातील आरक्षण जाहीर झाले असून आता 21 जून रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

तर या यादीवर 27 जून पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत व एक जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार. 5 जुलैला मतदान केंद्र निहाय या सर्व याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीला एक वेगळाच रंग येणार आहे






















