कराड : सामाजिक कार्य कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असणारे आई फाउंडेशन बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाटण व नोटरी भारत सरकार अॅड. विठ्ठलराव येळवे(नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व गर्भवती महिलांना शतावरी पोस्टीक आहाराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी पुढे आला होता.
तळमावले. कालगाव. धामणी या परिसरातील महिलांनी येळवे कुटुंब यांचे मनापासून आभार मानले . या कार्यक्रमामध्ये प्रमुख संगीता येळवे, आई फाउंडेशन प्रमुख पाटण, मीना साळुंखे गट विकास अधिकारी पाटण, विजय विभुते सार्वजनिक विकास गट अधिकारी, अरुण जाधव वैद्यकीय अधिकारी कालगाव, स्वाती बावडेकर सरपंच कालगाव, ग्रामपंचायत प्रियंका काळे वैद्यकीय अधिकारी कालगाव व पोलीस प्रशासन प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर येळवे कुटुंबियांनी रक्तदान दात्यांचे व गर्भवती महिलांचे ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. समस्त तळमावले, कालगाव परिसरातील नागरिकांचे कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.