सातारा दि. 19 : कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णांलयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू नाही अशा रुग्णालयांमध्ये शासकीय दरांपेंक्षा जास्त आकारणी केलेल्या देयकासंदर्भात कामकाज करण्याकामी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन संजय आसवले, डॉ. देविदास बागल जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, सातारा यांची नेमणूक केली आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये कोणत्याही रुग्णांलयामध्ये बिलासंदर्भात काही शंका असल्यास नागरिकांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री क्र. 1077 वर संपर्क साधून शंकाचे निरसण करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने रुग्णांलयांमध्ये रुग्णांचे होणारे बील तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या आदेशानुसार संजय आसवले उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 21, सातारा यांच्या अधिपत्याखाली एकूण 60 हॉस्पिटलच्या तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामध्ये रुग्णांचे देयक तपासण्यासाठी ऑडीटर व समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
दि. 6 एप्रिल 2021 रोजी श्री. संजय आसवले उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरांवर आढावा बैठक घेऊन तपासणी अधिकारी व ऑडीटर यांना जादा आकारणी केलेल्या रुग्णांच्या देयकाची कशा पध्दतीने तपासणी करावी याबाबत चेकलिस्ट फॉर्म दिला असून शासनाकडील अधिसूचना क्र. Corona-2020/c.R97/Aro-5, दि. 21 मे 2020 आकारणी करण्याबाबत संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत.
दि. 1 ते 15 2021 एप्रिल 2021 या दरम्यान सातारा जिल्ह्यांमधील एकूण 60 रुग्णालयांची तपासणी केली असता त्यापैकी 15 मधील 223 रुग्णांचे देयक तपासणी ऑडीटर मार्फत केलेली आहे. 223 रुग्णांचे रुग्णालयांनी आकारण्यात रु. 1,05,04,751/- (रुपये एक कोटी पाच लाख चार हजार सातशे एकावन्न ) आलेली आहे. 223 रुग्णांपैकी 14 रुग्णांचे रु. 1,28,442/- (एक लाख अठ्ठावीस हजार चारशे बेचाळीस रुपये फक्त) कमी करण्याबाबत ऑडीटर यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना कळविले आहे.
संबधित उपविभागीय अधिकारी यांनी शासकीय दरांपेक्षा जादा आकारणी केलेल्या बीला संदर्भात आकारणी केलेली रुग्णांस परत करण्याकामी संबंधित रुग्णालयांस कार्यवाही करण्यातबाबत कळविण्यात आले आहे.कोरोना रुग्णाचे देयक दि. 15 एप्रिल 2021 रोजी ऑडीटर यांनी कळविल्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांनी 14 रुग्णांचे एकूण रक्कम रुपये 1,28,442 रुगणांस परत करण्याबाबत रुग्णांलयास आदेश देण्यात आलेले आहेत.