गुणवत्तावाढिसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यातच भर म्हणून दहिवडी कॉलेज ज्युनियर विभागाच्यावतीने डी. सी.पॅटर्न चा पाया घातला गेला असून या डी.सी.पॅटर्नचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी फायदा होत असून विविध विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
महाविद्यालयात डी.सी.पॅटर्न मध्ये माफक फी भरून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.याचा फायदा कशाप्रकारे होतो आणि झालाय हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असनाऱ्या माजी विद्यार्थिनी पूनम जाधव या विद्यार्थिनीने आपल्या अनुभवाच्या आधारे कथन केले,त्याचबरोबर डी. सी.पॅटर्नच्या पहिल्या तीन’मध्ये आलेल्या आणि विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना या डी. सी.पॅटर्नचा फायदा कशाप्रकारे होतोय,ते सांगितले.
दहिवडी कॉलेज दहिवडीचा नवीन पॅटर्न विद्यार्थी वर्गासाठी चांगलाच उपयुक्त ठरत असून विद्यार्थी फायदेमंद ठरत असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज दहिवडीचे प्राचार्य बबन खाडे यांनी दहिवडी कॉलेजमध्ये आयोजित विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळाव्यात केले.या पॅटर्ननुसार सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अभ्यासपूरक खोलीमध्ये अभ्यास करता येणार असून मार्गदर्शनासाठी चांगला सुमारे २५ एवढ्या संख्येचा दर्जेदार प्राध्यापक वर्गही आहे.विद्यार्थी विकास आणि गुणवत्तावाढ व्हावा या दृष्टीने निर्माण करण्यात आलेला हा पॅटर्न विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे.
या विद्यार्थी-पालक-शिक्षक सुसंवाद मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती विद्यमान प्राचार्य डॉ.एस.टी.साळुंखे सर,उपप्राचार्या सौ.नंदिनी साळुंखे मॅडम,दडस सर,म्हस्के सर,शिर्के सर,घाडगे सर,यांच्यासह प्राध्यापिका वर्ग,पालक आणि डी.सी.पॅटर्नचे विद्यार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
दहिवडी कॉलेज ( ता माण ) येथे विद्यार्थी पालक शिक्षक मेळावा संपन्न