पिंपोडे बुद्रुक- प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून येत्या चार पाच दिवसात आचारसंहिता लागू होईल.गेल्या सात वर्षांतील सत्ताधारी यांच्या कारभाराला सभासद वैतागले असून परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे.बँक टिकविण्यासाठी परिवर्तन करावेच लागेल.परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे यांनी केले.कोरेगाव तालुका शिक्षक समिती च्या वतीने सप्तपदी मंगल कार्यालय कुमठे (कोरेगाव ) येथे आयोजित भव्य शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी बोलताना शिंदे पुढे म्हणाले बँकेच्या इतिहासात शिक्षक समितीने फक्त एकदाच नोकर भरती केली.परंतु विरोधी संघटनेने प्रत्येक वेळी नोकर भरती करून बँकेच्या व्यवस्थापन खर्चात सातत्याने वाढ केली.आज बँकेत शिक्षक समितीच्या किती माजी चेअरमन यांची मुले बँकेत काम करत आहेत आणि संघाच्या किती चेअरमन यांची किती मुले बँकेत काम करत आहेत.यांची यादीच त्यांनी वाचून दाखवली.परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.आणि परिवर्तन करण्याची ताकद शिक्षक समितीत आहे त्यामूळे स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक व महिला सभासदांची विशेष उपस्थिती होती.तसेच बँकेचे संचालक चंद्रकांत मोरे,शिवाजी शिंदे ,किरण यादव यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विश्वास चव्हाण,शंकर देवरे,प्रदीप कदम,हिंदुराव भोसले,नितीन फाळके,संजय लेंभे,अनिल कदम,मुस्कान आतार आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्वांनी बँकेत परिवर्तन करण्यासाठी तन मन धन अर्पून सज्ज राहण्याचे आवाहन केले.

यावेळी सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष बा. दि.बर्गे,उपाध्यक्ष सुदाम खरात, ज. ग.माने,दिलीप फाळके, आर. टी.कदम,रामराव बर्गे,शहाजी धामनेरकर,जगन्नाथ भोसले,दादा चव्हाण यासह अनेक सेवानिवृत्त सभासद हजर होते.तसेच गजानन वारागडे,अनिल डोईफोडे,अनिल चव्हाण,तानाजी यादव,नवनाथ जाधव, महादेव क्षीरसागर यांचीही विशेष उपस्थिती होती. कोरेगाव तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष नितीन शिर्के,सरचिटणीस नेताजी जगताप,उपाध्यक्ष उदय घोरपडे,कार्याध्यक्ष सुरेश पवार,कोषाध्यक्ष सतीश ढमाळ, सहचिटणिस प्रकाश पोळ,प्रसिद्धी प्रमुख अकबर मुलाणी तसेच महिला आघाडी प्रमुख मुस्कान आतार कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन शिर्के,सूत्रसंचालन संजय चव्हाण व सारिका टंकसाळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन सतीश ढमाळ यांनी केले.
शिक्षक मेळाव्यास संबोधन करताना राज्याध्यक्ष उदय शिंदे आणि इतर मान्यवर
































