आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्याची पाटण तालुक्यातुन मागणी
पाटण प्रतिनिधी: शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यामुळे पाटण मधील मराठा क्रांती चळवळ व मराठा युवकांनी आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती या सरकारने करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. नरेंद्र पाटील यांच्याकडे अध्यक्षपदी असताना पाटण तालुक्यातील अनेक युवकांना आर्थिक विकास महामंडळ या योजनेतून लाभ झाला आहे.शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षण व समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू या निर्णयाचे आम्ही समाज म्हणून मनापासुन स्वागत करतोय. शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, समाज सरकारचा ऋणी व कायम सरकारच्या सोबत उभा राहील.मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची 1997 रोजी स्थापना झाली त्यानंतर 2017 मध्ये आपल्या सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळ पुनर्जीवित करत 400 कोटींची तरतूद केली व महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्रजी पाटील साहेबांची निवड केली. नरेंद्र पाटील साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काडत मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहित करून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून निधी वाटप करण्यात आले व मराठा समाजातील हजारो तरुणांना स्वावलंबी बनवले नंतर 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व नरेंद्र पाटील साहेबांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले व मराठा समाजाशी कसली आत्मीयता नसणारे समाजाच्या प्रति ठाम भूमिका न घेणारे अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली.तेंव्हा पासून आज रोजी पर्यंत महामंडळासाठी सर्वात कमी निधी मिळाला व समाजातील फक्त शेकडो तरुणांना लाभ घेता आला. मराठा समाजाचा वतीने पाटण तालुक्यातील युवक विनंती करतो की नवीन सरकारने विचार करावा असे तालुक्यातील युवक मागणी करत आहेत. मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या स्व.आ.आण्णासाहेब पाटील यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे आहेत. मराठा समाजाशी तळमळ असणारे मराठा समाजाची ठाम भूमिका मांडणारे त्यांचे सुपुत्र मा.आ नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करावी ज्यामुळे मराठा समाजातील लाखो तरूण उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहतील.- पवन तिकुडवे पाटील – मराठा क्रांती चळवळ समन्वयक






















