आज रोजी मा.वनक्षेत्रपाल सो.वाई याचे सम्वेत वाई-पाचवड डांबरी रस्त्यावर फिरती करीत असतांना मौजे-पाचवड गावच्या हद्दीत आरोपी स्वपनील प्रकाश बांदल वय वर्षे २८ रा.अम्रतवाडी पाचवड ता.वाई,जि.सातारा यांनी त्यांचे मालकीच्या टाटा कंपनीच्या टेम्पो क्र.MH-11-AL-5988 मधून विनापरवाना,विनापासी, विनाशिक्का रायवळ जातीचा लाकूड माल वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले, सदरचा टेम्पो चौकशीकामी जप्त करून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वनक्षेत्रपाल कार्यालय वाई यांच्या आवारात नेवून लावला, सदरचा जप्त रायवळ जातीचा लाकूड माल टेम्पो क्र.MH-11-AL-5988 अंदाजे किमंंत 550000/-रु.असून त्यावर वनरक्षक बेलमाची कडील प्र.गु.रि.क्र.३/२०२२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई मा.उपवनसंरक्षक महादेव मोहिते साहेब, मा.सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई स्नेहल मगर ,वनपाल भुईंज संग्राम मोरे, वनरक्षक भुईंज संजय आडे यांनी पार पाडली.