सातारा जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सातारा व्यतिरिक्त शासकीय किंवा खाजगी हॉस्पिटल शिवाय पर्याय राहत नाही .यामुळे रुग्णांची गैरसोय होवून आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते .या बाबी विचारात घेवून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळाने जिल्हयातील शासकीय रुग्णालये व कोविड सेंटरसाठी व्हेंटीलेटर व ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर व बाय बायपॅप मशीन वितरीत करणेचा निर्णय घेतला आहे .याच पाश्र्वभुमीवर खटाव व माण तालुक्यासाठी आज २ व्हेंटीलेटरचे वितरण बँकेचे अध्यक्ष मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक श्री .अनिल देसाई व श्री .प्रदिप विधाते यांचे उपस्थित करणेत आले .यावेळी मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसल म्हणाले, बॅंकेने कोरोनाचे पाश्र्वभुमीवर सामाजिक बांधिलकी जपत जिल्हयातील शासकीय रुग्णालये व कोविड सेंटरला व्हेंटीलेटर व ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर व बाय बायपॅप मशीन उपलब्ध करुन देवून इतर सहकारी बँकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा बँकेच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना मदतीचा हात मिळाला आहे. सदर उपकरणे ही लाईफ केअर अॅण्ड सव्र्हिसेस, सातारा या नामांकित कंपनीकडून खरेदी केलेली आहेत .श्री .अनिल देसाई म्हणाले, स्वयर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचारांची जोपासणा करणारी ही बँक असून बँकिंग कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकी नेहमीच जपत असते .बँकेने खटाव व माण तालुक्यातील व्हेंटीलेटर व ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरची गरज विचारात घेवून आवश्यक त्या ठिकाणी सदर उपकरणे पुरविली आहे .मा ..श्री .प्रदिप विधाते म्हणाले, कोरोना विषाणूचा पादूर्भाव रोखणेसाठी बॅंकेने मागील वर्षीही शासनास आर्थिक तसेच विविध रुपाने मदत केलेली आहे .यावर्षीही या उपकरणांचे माध्यमातून खटाव व माण
या दुष्काळी तालुक्यातील बाधित रुग्णांना मदत होणार आहे . यावेळी उपस्थित सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री .हरिष पाटणे व व सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री .विनोद कुलकर्णी यांनी सातारा जिल्हा बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार मानून शुभेछ्या दिल्या.