फलटण तालुक्यातील गिरवी गावामध्ये मागील महिन्यात झालेल्या वादातून आरोपी दिगंबर रोहिदास आगवणे याचे विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र नं-४३४/२२, हा गुन्हा दाखल होता, फिर्यादी बाळासाहेब उर्फ जगदीश कदम यांनी आरोपीचे चुलते, धर्मराज आगवणे यांना तुम्ही खासदार यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला खोटा तक्रारी अर्ज दिला आहे काय? असे विचारला असता ? सदर धर्मराज हे म्हणाले की मी कुठलाही अर्ज दिला नाही ,माझा आणि खासदार यांचा काही संबंध नाही, मला लघवीची पिशवी लावली आहे, असे असताना बाळासाहेब कदम म्हणाले की मग अर्ज कुणी दिला. ते म्हणले मला काय माहित मी काही सही केली नाही .
धर्मराज आगवणे यांना असे बाळासाहेबांनी विचारल्याचा राग मनामध्ये धरून बाळासाहेब कदम यांचे राहते घरी दिनांक १४/०६/२०२२ रोजी जाऊन त्यांना जीवे मारण्याच्या हेतूने डोक्यावर पिस्तूल रोखून दिगंबर आगवणे यांनी भीती दाखवल्याचा आरोप होत आहे .त्यानंतर गिरवीच्या ग्रामपंचायत समोर चौकामध्ये आगवणे व कदम यांची शाब्दिक बाचाबाची शिवीगाळ झाली त्यावेळी देखील त्याने बाळ्या तुला गाडी खाली खेचतो मारून टाकतो अशी धमकी दिली व बंदुकीचा धाक दाखवला होता याबाबत आगवणे याच्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता , यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज सातारा येथील जिल्हा न्यायालयात आगवणे यांनी केला होता, फिर्यादी तर्फे सरकारी वकील मुके, तसेच ॲंड.सचिन शिंदे ॲंड.अमर काटकर , यांनी तर आरोपी दिगंबर आगवणे तर्फे ॲंड.विजय ठोंबरे यांनी युक्तिवाद केला, परंतु आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी व यापूर्वी दाखल असलेले गंभीर गुन्हे यामुळे आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे, तर आरोपी झालेला असून फलटण ग्रामीण पोलीस फरारी आरोपी आगवणे याचा शोध घेत आहेत.






















