महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: दहिवडी
माण तालुका ही गुणवत्तेची खाण आहे.नैसर्गिक दृष्टया अडचणी असूनही इथला माणूस परिस्थितीशी झुंजत राहतो, याच कारण मुख्यत्वे शिक्षण हेच आहे.शिक्षकांनी समर्पित भावनेने काम केल्यामुळे असंख्य लोक विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.माण तालुका प्राथमिक शिक्षक संघ ही तालुक्यातील शिक्षकांच्या व शिक्षणाच्या बाबतीत सतत कार्यरत असणारी संघटना असून शिक्षक संघास सहकार्य राहील असे प्रतिपादन माणचे नुतन गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी केले.
श्री.गोरख शेलार यांची बदली सोलापूर येथे झाली असून त्यांच्या जागी सर्जेराव पाटील यांची बदली माण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी झाली आहे.नुकताच त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
शिक्षक बॅंकेचे उपाध्यक्ष तथा माण तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र अवघडे यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या शिष्टमंडळाने पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी महेंद्र कुंभार, किशोर देवकर, रामभाऊ खाडे, शशिकांत खाडे,अजिनाथ गलांडे, दत्तात्रय खाडे, दत्तात्रय कोळी, सोपान मोटे,सुस्तरपड सर तसेच संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




















