फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यात कधीही जातीपातीचे राजकारण आम्ही केले नाही व करणार सुध्दा नाही, राजाला जात नसते. फलटणमध्ये कोणालाही उमेदवारी देताना त्याची जात पात बघुन नाही तर त्याचे कर्तृत्व बघुनच उमेदवारी दिली गेली. खासदारांनी धनगर व मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे थेट आव्हान विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांना केलं आहे.
फलटण येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ना. रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, बाहेरील तालुक्यातील घराच्या आसपास फिरकून ही द्यायची लायकी नाही अशी नेतृत्व तालुक्यात आणायची आणि मला शिव्या घालायच्या, एका जातीचे राजकारण करून महाराष्ट्रात व फलटण मध्ये कुणीही नेतृत्व निवडून आलं नाही आणि येत नाही, हिंमत असेल तर स्वतःच्या हिमतीवर लढा व दुसऱ्याच्या मदत घेऊन कशाला लढता, २०२४ साली सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहेत. त्यांची सर्व आव्हाने मी स्वीकारली आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये नक्कीच योग्यरित्या बघितले जाईल.
राज्यात काय घडलं तर पवार साहेबांमुळे घडतं आणि जिल्ह्यात काय घडलं तर रामराजेंनमुळे घडतं नियमच झाला आहे कुणाला काय बोलायचं, फलटण तालुक्यामध्ये कधीही राजकारण आम्ही जातीपातीचे केले नाही व यापुढेही करणार नाही. फलटणची संस्कृती वेगळी आहे ती संस्कृती जपण्याचे जस आमचं काम आहे तस तुमचं ही काम आहे असले किती आले किती गेले तरी आपण त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. थोर साध्वी असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये राजकारण करणाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचे राजकारण करु नये, तुझी लढाई तू कर ना बाहेरून कशाला लोक आणता, असा टोलाही ना. रामराजे यांनी लगावला.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, आज आपण जातीयपातीय राजकारण होताना पाहत आहे जयंती एका जातीधर्मात अडकुन राहू नये म्हणून आपण सर्वसमावेशक जयंती साजरी करण्याचा करण्यात निर्णय घेतला सर्व महापुरुष जातीय चौकटीत बंदिस्त करू नये एकच जयंती असावी म्हणून मी अध्यक्षपद मी स्वीकारले. कोणत्याही महापुरूषाला जातीपातीमध्ये अडकवणे योग्य नाही. सर्व समाजातील सर्वांनीच एकत्र येवून जयंती उत्सव साजरे केले पाहिजेत. आपल्याला जयंतीच्या नावावर राजकरण करायचं नाही, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं थोर कार्य होऊन गेल आहे.
आमदार दिपक चव्हाण म्हणाले , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जगात आदर्श राज्यकर्ता म्हणून नाव मिळवलं. फलटण तालुक्याला एक आगळीवेगळी परंपरा आहे, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेृत्वाखाली फलटणमध्ये सर्वसमावेशक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे. पुढील दोन महिन्यानंतर राजकीय उत्तर दिलं जाईल.

श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, घाटावरच्याला बाराशेच लीड मिळत नाही नगर पंचायतीला निवडून येता येत नाही, एकाचा खासदारकीला घाम निघतो माळशिरसच्या जीवावर निवडूण यावं लागत. आम्ही कधीही भेदभाव केला नाही, जयंतीला मोठया प्रमाणावर जनता बघितल्यावर तुम्हाला धनगर समाज आठवतो अध्यक्षपद घ्यायचं तर घ्या असा टोला लगावला. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर व ईतर मान्यवर उपस्थीत होते






















