फलटण : सरकारी कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांने फलटण शहर पोलीस ठाण्यात ग्राहका विरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
नोंदविलेल्या तक्रारीनुसार, अनिरुद्ध आत्माराम लिमकर वय, 35, सहाय्यक अभियंता, फलटण शहर, शाखा नंबर 1 रा. बारामती यांनी नंदकुमार हरिभाऊ कचरे रा.धुळदेव ता. फलटण यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास लिंबकर महावितरण कार्यालयात काम करीत असताना हरिभाऊ कचरे यांनी कार्यालयात येऊन हॉटेलचे वीज जोडणी जोडून देण्याची मागणी केली. त्यावेळी लिमकर यांनी कचरे यांना आधी विज बिल भरण्याची सूचना केली. तर आधी वीज जोडणी करून द्या मग मी विज बिल भरतो असे म्हणत हुज्जत घातली. त्यानंतर लिमकर घरी जाताना त्यांच्या चारचाकी गाडीला आडवे जाऊन त्यांना घरी जाण्यास प्रतिबंध केला. सरकारी कामात अडथाळा निर्माण केल्याबद्दल, फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. भा द वि स क ३४१ ,१८६ या कलमा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हवलदार वीरकर पुढील तपास करीत आहेत.