बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र शासन उपक्रम अंतर्गत भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023 अशा खोट्या पद्धतीने जाहीर केल्या प्रकरणी संयोजक व त्यामध्ये जाहिराती मध्ये असणारे सर्व मेंबर व आयोजकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन सातारा पोलिसांना देण्यात आले. व्हाट्सअप ला एक पोस्ट आली होती त्या पोस्टमध्ये “महाराष्ट्र शासन -शासन उपक्रम पर्यटन धोरण 2016 अंतर्गत महाराष्ट्र राज्य पर्यटन कला सांस्कृतिक मुंबई महाराष्ट्र राज्य पुरस्कृत भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023 असे जाहिरात करत आहेत, काही संयोजक व आयोजक २१०१/- रुपये फी भरून भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्काराने सन्मानित करत आहेत. असा कोणताही पुरस्कार महाराष्ट्र शासन पर्यटन व कला सांस्कृतिक विभागाने जाहीर केलेला नाही.
अशाप्रकारे लोकांची फसवणूक करून पैसे घेऊन असे पुरस्कार देणे कायद्याने गुन्हा आहे. हा कार्यक्रम 6 फेब्रुवारी, सोमवारी, हा कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य शाखा यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद समोर सातारा येथे होत आहे , तो कार्यक्रम तत्काळ थांबवावा ,नागरिकांना संयोजक आयोजकांनी सर्व पैसे परत द्यावे व अशा व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी पोलीस प्रशासनाकडे करत आहे.
त्या संयोजक आणि आयोजकांची नावे जाहिरातीचा पेपर ही याबरोबर जोडत आहे. तर पोलीस प्रशासनाने अशा फसवणूक करणाऱ्या संस्था व त्या संबंधित असणारे सर्व संयोजक, आयोजक व साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा ,कडक कारवाई करावी कारण साताऱ्यातही नाही पूर्ण महाराष्ट्रात असे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम चालू आहे व कितीतरी ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे अशा भरपूर नागरिकांकडून या संस्था पैसे उकळून पुरस्कार जाहीर करण्याचे कार्य करत आहेत तर अशा ज्या संस्था आहेत व त्यांचे बॉडी मेंबर्स त्यांच्यावर कायदेशीर रित्या कारवाई करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. व असे कार्यक्रम तात्काळ थांबवावे. असे निवेदन आज महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना देण्यात आले तसेच मेलद्वारेही सर्व शासकीय विभागात पाठवण्यात आले आहे
सौ प्रतिभाताई शेलार
संस्थापिका – महालक्ष्मी आधार फाउंडेशन