प्रतिनिधी साखरवाडी. सजीव सृष्टीचे अस्तित्व हे आजूबाजूच्या पर्यावरणावर अवलंबून आहे.आपल्या हव्यासापोटी मानवाने पर्यावरणाची अपरिमित हानी केली असल्याने पर्यावरण संवर्धनाची जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,पर्यावरणीय समस्या व त्याचे संवर्धन याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणाच्या विषयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी यासाठी सकारात्मक वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार (बाबा) यांनी व्यक्त केले.
नुकताच दिलीप पवार यांचा वाढदिवस साजरा झाला दिलीप पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनाठाई होणाऱ्या खर्चाला फाटा देत जागतिक पर्यावरण दिन प्राथमिक आरोग्य केंद्र साखरवाडी येथे झाडे देऊन वाढदिवस साजरा करत इतर युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस राजे गटाचे नितीन भोसले, समीर भोसले ,सचिन भोसले, मच्छिंद्र भोसले, अक्षय रुपनवर,आभय निंबाळकर ,सागर कांबळे, निवृत्ती भोसले, माऊली भोसले, राजाभाऊ भोसले, पोपट भोसले, आर.बी.भोसले, सचिन फडतरे, हिंदुराव वारे, दिलीप पवार व सर्व माजी सैनिक संघटना व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.