आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले,
अध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भारतातील स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वात
महत्वाचा दिवस आहे कारण आपल्या देशाला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ या
दिवशी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. ७४ व्या
स्वातंत्र्यदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
यांचे हस्ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ध्वजारोहण उत्साहपूर्ण
वातावरणात झाले. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले,
स्वातंत्र्यानंतर, भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपला देश
विविधतेत त्याच्या ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे. आपण वाईट व्यक्तींपासून त्यांचे
संरक्षण करण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपल्या देशाची प्रगती
करणे आणि जगातील सर्वोत्तम देश बनविणे ही आपली जबाबदारी आहे.
प्रजासत्ताक देशाचे पावित्र्य आपण सर्वांनी राखलेच पाहिजे. संविधानाने
दिलेले अधिकार व त्याप्रती आपली कर्तव्य जाणून घेऊन त्याचा आदर करणे
तसेच भ्रष्टाचाराचा नायनाट करून लोकशाही बळकट करणेसाठी बँकेच्या सर्व
कर्मचाऱ्यांना त्यांनी आवाहन केले. सातारा जिल्हा बॅंकेबाबत बोलताना ते म्हणाले, सातारा जिल्हा बँकेचे कृषी व ग्रामीण विकासात मोठे योगदान असून सर्वसामान्यांचे आर्थिक जीवन उंचावणेत महत्वाची कामगिरी बजावत जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासाची प्रमुख अर्थवाहिनी असणाऱ्या या
बँकेने उत्कृष्ठ कार्यक्षमतेचे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त केले आहेत . या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले,
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ग्रामीण विकासाच्या कार्याचे स्वप्न
प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्हा बँक आज योग्य पद्धतीने कार्यरत असल्याने
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये बँकेचे उत्तम योगदान आहे. बँकेबद्दल
जनतेमध्ये असलेली प्रचंड विश्वासार्हता आहे. बँकेची उत्कृष्ठ कार्यप्रणाली व
सेवा यामुळे बँकेच्या ठेवीत भरघोस वाढ होत आहे. बँकेने ग्राहकांना आधुनिक
बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा उपयोग
केला असून ग्राहकांना आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी., एस.एम.एस. सुविधा,
मोबाईल बँकिंग,युपीआय इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या
सुविधांचा व योजनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी बँकेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.यावेळी बँकेचे संचालक श्री. प्रकाश बडेकर, संचालिका सौ. कांचन साळुंखे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे, विविधविभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालयातील विविध
विभागांचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.