भोर : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या वतीने घेण्यात येणाऱ्या पुणे जिल्हा कुमार गट निवड चाचणी स्पर्धेला काल (दि.20 )सुरवात झाली.
या स्पर्धेसाठी ग्रामीण शहरी भागातून पात्रता फेरीसाठी 120 संघांनी सहभाग नोंदवला. 60- 60 संघांचे दोन लॉट पाडून एका लॉट ची स्पर्धा दिवसभरात पूर्ण झाली. एका लॉट मधून 8 आणि दुसऱ्या लॉट मधून 8 संघ असे 16 संघ साखळी फेरीमध्ये जातील व तिथे मागील वर्षी पात्र झालेले 16 संघ अशा 32 संघांची साखळी फेरीतील सामने होतील.
काल झालेल्या स्पर्धेत एका लॉट मधून भोर मधील एकलव्य क्रिडा संस्थेचा एकलव्य कबड्डी संघ साखळी फेरीसाठी पात्र झाला. भोर सारख्या ग्रामीण भागातुन पहिल्यांदाच कुमार गटासाठी एकलव्य कबड्डी संघ निवड झाल्यामुळे खेळाडूंनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुढे सुद्धा उत्तम खेळ करून तालुक्याचे नाव जिल्ह्यात, महाराष्ट्रात गाजवावे असे मत माजी राष्ट्रीय खेळाडू आणि राजगड ज्ञानपीठ चे माजी प्राचार्य श्री व्ही एस पवार सर यांनी मांडले. यावेळी एकलव्य संघांचे मार्गदर्शक रोहिदास तनपुरे सर, अध्यक्ष प्रदिप मालुसरे, सचिव सोमनाथ जाधव,सुमित पवार, सुशील खोपडे, विकास मालुसरे उपस्थित होते.






















