फलटण : फलटण तालुक्यातील बळीराजाच्या शेती पंपाची विज महावितरणे पूर्वसूचना न देताच बंद केली
प्रत्येक वेळेसच आमच्या बळीराजालाच का वेठीस धरले जाते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो मोठ्या मोठ्या घोषणा शेतकऱ्यांच्यासाठी केला जातात मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही इलेक्शन लागली की शेतकऱ्यांच्यासाठी आश्वासनांची खैरात असते परंतु प्रत्यक्षात मात्र बारा महिने अठरा काळ शेतकऱ्यांच्या नशिबात शिमगाच आज दिनांक २१-११-२०२२ रोजी सकाळपासून शेतकऱ्यांची वीज पंपाची वीज बंद केली गेली असून विचारणा केली असता महावितरणचे अधिकारी असमाधानकारक उत्तरे मिळाली शेती पंपाची वीज बिल माफी हा विषय सरकार जाहीर करते आणि परत तेच वीज कनेक्शनच नव्हे तर संपूर्ण ट्रांसफार्मरच बंद केला जातो ह्याच केंद्र सरकारने मोठ मोठ्या उद्योगपतींचे हजार कोटींची कर्जमाफ केली मग हे का समजलं नाही की शेतकरी पिकतो म्हणून देश खातो पण शेतकऱ्यांनी दाद मगायची कोणाकडे काही शेतकऱ्यांची गहू पेरणी झाली आहे परंतु त्यास पाणी देण्याकरिता शेतीपंपाची वीज पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली
शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे हे प्रशासन दखल घेणार तरी कधी प्रत्येक वेळेस बळीराजा मात्र उपाशी आणि प्रशासन व राज्यकर्ते मात्र तुपाशी