पुणे : मुंबई बेंगलोर हायवे वर नवले ब्रिज पुणे येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 40 जण किरकोळ जखमी तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी या अपघातात झाली नाही. जखमींना जवळील रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
घटना अशी घडली की भरधाव वेगाने कंटेनर (AP 02 TE 5858) मुंबई च्या दिशेने चालला होता. कंटेनर चे ब्रेक फेल झाल्याने तो पुढील गाडयांना धडक देत गेला. अपघातात एकूण 50 वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या अपघाताची चौकशी पुणे पोलीस करत आहे.
दरम्यान कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज पर्यंत आत्ता पर्यंत अनेक अपघात झाले आहे परंतु कोणतेही ठोस पाऊल यावर घेण्यात आलेले नाही. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत तर काहींना अपंगत्व आले आहे सरकारने यावर ठोस पावले उचलण्याची गरज आहे असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.
अपघातामुळे रस्त्यावर सांडलेले ऑइल हे अग्नीशामक दलाने धुवून साफ केले तसेच स्थानिक पोलीस, अग्नीशामक दल, स्थानिक तरुण नागरिक यांच्या मदतीने अपघातातील लोकांना रुग्णालयात घेऊन जाण्यास मदत झाली.






















