नागठाणे/प्रतिनिधी
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा शुक्रवार दि. 6 रोजी नागठाणे येथे आगमन होत आहे. तरी नागठाणे पंचक्रोशीतील सकल हिंदू बांधवांनी या यात्रेच्या स्वागतासाठी नऊ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन ॲडव्होकेट महेश तावरे,नागठाणे यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की,अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री . छ.शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत . या यात्रे निमित्ताने महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण हिंदू समाजाने करावे तसेच , राष्ट्रजागरण कार्यातील महाराजांच्या योगदानाबद्दल समाजतील महाराज यांच्या विषयी कृतज्ञता भाव वृध्दींगत व्हावा यासाठी विश्वहिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने प.महाराष्ट्रामध्ये सर्वत्र या शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .तरी शुक्रवार दि. सहा रोजी यात्रेचे सकाळी नागठाणे येथे आगमन होणार असून संपूर्ण गावामधून ही यात्रा मार्गक्रम करून पुढील नियोजित मार्गाने कराड दिशेनी मार्गस्थ होईल .
































