महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रमुख उपस्थितीत कराड येथे यशवंत विकास आघाडी व राजेंद्र सिंह यादव यांच्यासह बारा नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष प्रवेश व मुख्यमंत्र्यांनी कराडला भरघोस निधी देण्याचे आश्वासन ही यादव यांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रमुख उपस्थितीत आज कराड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मेळावा संपन्न झाला. पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब या मेळाव्यास त्यांच्यासमवेत उपस्थित होते. यावेळी यांनी आपल्या समर्थकांसह राजेंद्रसिंह यादव यांनी मोठ्या दिमाख्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनीही आपल्या बारा नगरसेवकांच्या साथीने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.
व यावेळी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या सर्वांचे बाळासाहेबांच्या शिवसेनेत मन:पूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत, आमदार मा. शहाजीबापू पाटील, मा. महेशजी शिंदे यांच्यासह बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.जयवंतराव शेलार खंडाळ्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, साताऱ्याचे युवासेना जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, सातारा शहराचे शहरप्रमुख निलेश मोर, तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.