| प्रहारच्या दणक्यानंतर पुरवठा विभाग ऑनलाईन आली जाग
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वयीत झाल्याने रखडलेली प्रकरणे मार्गी तीन ते चार महिन्यांत पासुन पुरवठा विभागाची ऑनलाईन यंत्रणा बंद असल्याने नागरीकांची प्रचंड गैरसोय होत होती. तर गोरगरीब व अपंग लाभार्थी शासनाच्या अन्न धान्य योजनेपासुन वंचीत रहात आहेत. त्यामुळे शासनाने पुरवठा विभागाची ऑनलाईन यंत्रणा तातडीने कार्यान्वयीत करावी व रखडलेली प्रकरणे मार्गी लावावीत अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा प्रहारच्या मनोज माळी यांच्या वतीने देण्यात आला होता. याची दखल घेत बुधवार पासुन ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आली आहे.पुरवठा विभागाच्या वतीने शिधापत्रीका ऑनलाईन करणे, नावे कमी करणे, वाढवणे, पात्र लाभार्थांचा अन्नधान्य योजनेत सामावेश करणे, अपंग, दिव्यांगांचे एपीएल शिधापत्रीका करणे आदी प्रकारची कामे ऑनलाईन करण्यात येत आहेत. मात्र गेली तीन ते चार महिन्यांपासुन ऑनलाईन यंत्रणा बंद असल्याने कराडसह सातारा जिलह्यातील हजारो प्रकरणे रखडली होती. त्यामुळे पात्र लाभार्थी अन्नधान्य योजनेपासुन वंचित रहात होते. याबाबत प्रहारचे मनोज माळी यांनी प्रांत उत्तम दिघे यांना निवेदन देत पुरवठा विभागाची ऑनलाईन यंत्रणा तातडीने कार्यान्वयीत करण्याची मागणी केली होती. तसेच ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वयीत न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता. याची दखल घेत पुरवठा विभागाची ऑनलाईन यंत्रणा कार्यन्वयीत करण्यात आली आहे. | |