फलटण प्रतिनिधी
भारतीय संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे संविधान भारताला सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते नागरिकांना न्याय,समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते युवकांनी संविधान साक्षर होऊन सर्वसामान्यांना त्यांचे कर्तव्य व हक्क यांचे जाणीव करून देणे गरजेचे आहे याच उद्देशाने संविधान दिन सर्वत्र साजरा केला जातो
आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी साखरवाडी मध्ये ही साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयात साखरवाडी चे माजी सरपंच विक्रम सिंह भोसले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर आंबेडकर नगर येथे संविधान दिनाचे औचित्य साधून साखरवाडी मधील ग्रामपंचायत कार्यालय व आंबेडकर नगर येथे लोकांना संविधानाचे महत्व संविधानाचे महत्त्व पटवून देऊन संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले व साखरवाडीत नागरिकास संविधान प्रास्तविकेच्या प्रतीचे वाटप करण्यात आले
यावेळी साखरवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक येळे आण्णा,मा.सरपंच विक्रम सिंह भोसले, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी तसेच साखरवाडीतील सर्व बौद्ध समाज साखरवाडी,फलटण उपस्थित होते






















