
तसेच संचालकपदी विठ्ठल भिकोबा खराडे, कांताबाई बन्यासो खराडे, मंगल रमेश खराडे, आनंदराव बापुराव खराडे, मोहन रघुनाथ खराडे, औदुंबर जगन्नाथ खराडे, अंकुश परशुराम बोबडे, राजेंद्र मुरलीधर गायकवाड, पोपट नामदेव राक्षे, आनंदा जगन्नाथ बोडरे यांची निवड झाली.
या निवडी झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक यांचा सत्कार करण्यासाठी अनपेक्षितपणे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला.
माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील श्री. भैरवनाथ व श्री. सिद्धनाथ शेतकरी विकास पॅनल चे १२ उमेदवार जवळपास १०० मतांच्या बहुमताने विजयी झाले होते.
तडवळे वि.का.स. सेवा सोसायटी ची निवडणूक जिंकुण व चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडी पर्यंत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे यांनी खूप परिश्रम घेऊन अतिशय नियोजनबद्ध राजकीय रणनीती आखली व यश संपादन केले.
माजी खासदार स्व.हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिराजभाई शेख यांनी 30 वर्षांपूर्वी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. तडवळे सारख्या गावात आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वसमावेशक नेतृत्व पुढे आले, गावातील सर्वांना बरोबर घेऊन जाणारे कधी ही कोणत्याही पदाची अपेक्षा न करता सर्वसामान्य लोकांची कामे करण्यात कायम अग्रेसर असणारे सिराजभाई शेख यांची सोसायटीच्या चेअरमन पदी झालेली निवड ही त्यांनी गावात केलेल्या कामाची पोहोच म्हणावी लागेल. कोणत्याही कामात कधीही राजकारण न आणता सर्वसामान्य लोकांच्या कामाला प्राधान्य देतात. म्हणूनच हे गुण हेरूनच माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी त्यांना मार्केट कमिटी वर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली होती.
माजी खासदार स्व.हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून यांच्या नेतृत्वात सिराजभाई शेख यांची राजकीय घोडदौड अधिक वेगाने सक्रिय होत असून ती आता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदा पर्यंत गेली पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. कामाची पद्धत पाहता ते तडवळे विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदाला निश्चितच न्याय मिळवून देतील.
या निवडीमुळे चेअरमन सिराज भाई शेख व व्हाईस चेअरमन पांडुरंग खराडे यांना ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या ॲड.सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष सुशांत भैय्या निंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग नाना गावडे शहराध्यक्ष अमोल सस्ते, अल्पसंख्यांक अध्यक्ष रियाज भाई इनामदार व इतर मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या.
या निवडीवेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, रामचंद्र खराडे माजी सरपंच तडवळे
पोपटराव खराडे माजी चेअरमन, संपतराव खराडे,
राजेश खराडे माजी चेअरमन, पोपट नाना खराडे पाटील, शंकरराव भोसले माजी व्हाईस चेअरमन,
रमेश आबा खराडे, विजय बापू खराडे, बाजीराव खराडे, रंगराव आप्पा खराडे, जयवंत सोनवणे, साधू टिळेकर, शंकरराव जगताप, सोमनाथ गायकवाड, दादा मोहिते, मनोहर खराडे, मच्छिंद्र भुजबळ, सर्जेराव खराडे, रमेश गायकवाड, वसंतराव भोसले, प्रदीप खराडे, शेखर खराडे, वैभव खराडे, शरद गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
या निवडी निवडणूक अधिकारी भावे मॅडम व सोसायटीचे सचिव मुलाणी साहेब यांच्या उपस्थितीत पार पडल्या.





















