फलटण : गारमेंट किंग प्लस या कापड दुकाना मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी २०१८ पासून आजपर्यंत वेळो वेळी दुकानातील तयार कपडे परस्पर दुसऱ्या दुकानात विकून, तसेच दुकानातील बिलिंग कोड डिलीट करून व ग्राहकांच्या उधारीचे येणारे पैसे असा एकूण १ कोटी ९७ लाख ५० हजार २५५ रुपयांचा अपहार केला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१८ पासुन ते आज पर्यंत वेळोवेळी सुमित हणमंराव जगदाळे व त्यांचे व्यवसाईक भागीदार घोंडीराम घाडगे यांच्या मालकीच्या गारमेंट किंग प्लस शाखा, फलटण या दुकानामध्ये काम करणारे सुनिल मच्छिद्र दोरगे रा. यवत, ता. पुरंदर, जि. पुणे, प्रसाद प्रकाश पंडीत ( दुकान अंकाऊटं) रा. वडुज, ता. खटाव, सातारा यांनी दुकान मालकांचा विश्वास संपादन करून, दुकानातील विवीध कंपनीचे व विवीध ब्रॅन्डचे लहान मोठया पुरुष, महीला व बालकाचे शेकडो कपडयाचे आज पर्यंत एकुण 1,50,000 बारकोड (वस्तु आवक ) पैकी 45530 वस्तुचे बारकोड हे दुकानाचे बिलींग सिस्टीम मधुन डिलीट करुन, एकुण किंमत 1,90,94809/- एवढया रक्कमेचा अपहार केला.
यापैकी काही माल पुसेगाव येथील इसम नामे नितीन फडतरे यांच्या मालकीचे वैष्णवी कलेक्शन मध्ये तसेच गंगाखेड जि. परभणी, येथील इसम नामे सुरेश आचमे यांच्या मालकीचे रा ज भगीरथ नावाचे कापड दुकानात विक्री केला आहे. तसेच वरील दोघांनी बिलद्वारे विकलेल्या मालांपैकी ग्राहकांकडुन येणारे एकूण बाकी 6,55,446/- रुपये दुकाणाचे अकाऊंटला जमा न करता स्वताकडे स्वता:चे आर्थिक फायदयाकरीता ठेवुन घेऊन सुमित हणमंराव जगदाळे यांची एकुण 1कोटी ,97लाख ,50हजार ,255/- रुपयांची फसवणुक केली असल्याची फिर्याद सुमित हणमंराव जगदाळे, मुळ रा. बिदाल, ता. माण, जि. सातारा, सध्या रा. बंगला नंबर 13, राधिका गार्डन, कोळकी, ता. फलटण यांनी दिली आहे.