उंब्रज प्रतिनिधी:-
उंब्रज गावच्या पूर्वेला , कृष्णा आणि तारळी या नद्यांच्या संगमावरती ऐतिहासिक व पुरातन शिवमंदिर हे उमेश्वर नावाने प्रसिद्ध असून या मंदिराला पुरातन वारसा लाभलेला आहे , या मंदिराच्या समोर नदीपात्रात शेकडो शिवलिंग असून ही शिवलिंग मान्यतेनुसार पाच पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा कृष्णा आणि तारळी या नद्यांच्या संगमावर्ती आले असताना या शिवलिंगांची स्थापना केली गेली असे येथील ग्रामस्थानचे म्हणणे आहे , या भावनेच्या आधारे अशी एक आख्यायिका आहे की … पाच पांडवांनी , पाच ठिकाणी , पाच शिवलिंग स्थापन केली ती पुढीलप्रमाणे… कोटेश्वर वरून कोर्टी , उमेश्वर वरून उंब्रज , बेलेश्वर वरून बेलवडे , निळेश्वर वरून वडोली निळेश्वर , भिकेश्वर वरून वडोली भिकेश्वर अशी ही शिवलिंगे स्थापन झाली असून या गावांमध्ये महाशिवरात्री हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जातो… महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी ग्रामस्थ व अनेक सामाजीक संघटना कडून उपवासाचे व फराळाचे पदार्थ दर्शन रांगेतील भाविणकासाठी मोफत सेवा म्हणून पुरवले जातात , तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करून भजन-कीर्तन व सामाजिक उपक्रमांनी कार्यक्रमांची भक्तिभावाच्या वातावरणात सांगता केली जाते