– सातारा जिल्ह्यामध्ये गेली ४ वर्षे श्रीम. अश्वीनी जंगम या जिल्हा हिवताप अधिकारी या पदावर काम करीत असुन त्या नेहमीच पदाचा दुरुपयोग करीत आहेत याबाबत सातत्याने सहसंचालक हिवताप पुणे यांना निवेदने, तक्रारी करून सदरची बाब निदर्शनास आणून दिलेली आहे पण अद्याप त्यांचेवर कोणती कारवाई केली याबाबतचे पत्र संघटनेकडे अवगत नाही . यापूर्वी ही रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा कार्यकाल वादग्रस्त ठरलेला आहे . श्रीम. जंगम या पदाचा दुरुपयोग करीत असुन मनमानी कारभार करीत आहेत . तो खालील प्रमाणे सन २०२० – २१ मध्ये झालेल्या विनंती बदल्या प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास पाठवताना जाणीवपुर्वक नियम बाह्य प्रस्ताव पाठवणे , ठरावीक कर्मच्याऱ्यांचे जाणीवपुर्वक व पुर्वग्रह दुषीत पणाने खोटे रेकॉर्ड करणे , गैरवाजवी कारणे देवुन कर्मच्याऱ्यांचे बेकायदेशीर रित्या वेतन रोखणे – याबाबत चौकशी करून श्रीम जंगम यांचे वर जबाबदारी निश्चीत करून व्याजाची रक्कम त्यांचे कडुन वसुल करण्यात यावी . , कर्मच्याऱ्यांना बोगस महाराष्ट्र दर्शनचे लाभ मिळवुन देणे , वरिष्ठांचे आदेश डावलुन बेकायदेशीर प्रतिनियुक्ती वर त्यांच्या मर्जीतील कर्मच्याऱ्यांना ठेवणे , शासकीय गाडी घेवुन त्यांचे सजाच्या बाहेर कोकणात फिरायला जाणे ( याबाबत एका दैनिकात बातमी प्रसिद्ध झाली होती . ) , जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मच्याऱ्यांना जाणीवपुर्वक अभय देणे .. ‘ , कोवीड च्या अगोदर प्रत्यक्ष कार्यालयात न येता घरातुनच ऑफीसचा कारभार चालवणं , वर्ग ३ च्या कर्मच्याऱ्यांना त्यांच्या अधिकार कक्षेत नसताना जाँबचार्ट व्यतीरीक्त कामकाज लावणे . , त्यांच्या मर्जीतील कर्मच्याऱ्यांना कामकाजात सुट देणे , गोपनीय अहवाल नोटींग कर्मच्याऱ्यांना न देणे , वारंवार मागणी करून कर्मच्याऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तक न देणे . वरील सर्व बाबीची चौकशी करून श्रीम अश्वीनी जंगम जिल्हा हिवताप अधिकारी सातारा यांचेवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने राज्याचे प्रधान सचिव (आरोग्य ) , संचालक , सहसंचालक यांना सदरच्या निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी महाराष्ट्र न्युजशी बोलताना व्यक्त केली