सातारा – कर्मच्याऱ्यांचे निर्वाह वेतन थांबवता येत नाही महाराष्ट्र नागरी सेवा ( पदग्रहण , अवधी, स्विय्येत्तर सेवा काळातील प्रदाने ) नियम १९८१ च्या नियम ६८ नुसार निर्वाह वेतन देण्याची तरतुद ही पूर्णतः घटनात्मक आहे . निर्वाह वेतन थांबवणे ही गंभीर बाब आहे . मा .अश्वीनी जंगम या मनमानी कारभार करीत असुन काही कर्मच्याऱ्यांच्या बाबतीत आकसाने ,सुडबुद्धीने व पुर्वगृह दुषीत पणाने वागत असुन त्याचे गैरवाजवी पद्धतीने वेतन रोखुन ठेवत आहेत . वेतन रोखण्याचा त्यांना अधिकार नसताना . मुंबई वित्तीय नियम १९५९ मधील नियम ९१ च्या तरतुदीनुसार ४१ मध्ये असंवितरीत वेतन बाबीची नोंदवही कार्यालयात उपलब्ध नाही . तसेच प्रत्येक सहा महिन्यातुन एकदा एकत्रीत अहवाल मा सहसंचालक (हिवताप ) यांना जिल्हा हिवताप कार्यालय सातारा यांनी पाठवलेला नाही . म्हणजेच जिल्हा हिवताप अधिकारी यांनी आकारण दिरंगाई केलेली आहे हे सिद्ध होत आहे . म्हणुनच मा अश्वीनी जंगम व जबाबदार क्लार्क यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावीत करण्यात यावी . जिल्हा हिवताप अधिकारी सातारा अश्वीनी जंगम यांचे कार्यकालात अधिकाराचा दुरुपयोग करून बऱ्याच कर्मच्याऱ्यांचे वेतन बेकायदेशीर पणे रोखलेले आहे . त्याची निपक्षपाती पणाने चौकशी करून त्याच्या ४ वर्षाच्या कार्यकालातील माहीती घेऊन जिल्हा हिवताप अधिकारी सातारा यांचे वर जबाबदारी निश्चीत करून सदर दिरंगाई कालावधीतील व्याजाची रक्कम अश्वीनी जंगम यांचे वेतनातुन वसुल करून सदर बाबीची नोंद त्याच्या सेवा पुस्तकात घ्यावी . अशी आग्रही मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ सातारा याचे वतीने मा सह संचालक (हिवताप ) यांचे कडे आग्रही मागणी केलेली आहे .