महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कराड /
मलकापूर नगरपरिषद कराड स्वच्छ भारत मिशन स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या गृहनिर्माण नागरिक कार्य मंत्रालय यांनी घेतलेल्या 2020 चे स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये देशांमध्ये पंचविसावा पश्चिम भारतामध्ये अकरावा क्रमांक प्राप्त केला आहे
मलकापूर नगरपरिषद एक नगरपरिषद या नाविन्यपूर्ण उपक्रमास सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मलकापूर नगर परिषद लोकसहभागाच्या माध्यमातून लोकहित उपयोगीयोजना व उपक्रम हाती घेतलेला आहे या अनुषंगाने सध्या महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी होऊ लागलेला गणेशोत्सव साजरा करणेबाबत भारती विद्यापीठ मलकापूर येथे नगरपरिषद मुसळगाव शहरातील सार्वजनिक मंडळे यांच्या झालेल्या बैठकीत शहरातील covid-19 वाढता प्रादुर्भाव विचारात घेता मलकापूर शहरातील एक नगरपरिषदे गणपती हा उपक्रम राबवणे बाबत सर्वानुमते ठरविण्यात आलेले असून या उपक्रमात शहरातील गणेश उत्सव मंडळांनी प्रतिसाद दिलेला आहे सदर बैठकीस नगरपरिषदेचे नगराध्यक्षा नीलम येडगे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे मुख्याधिकारी संजीवनी दळवी बी आर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पंडित पाटील मंडळ अधिकारी उपस्थित होते एकूण 1 ते 9 या प्रभागातील गणेशोत्सव मंडळांनी संमती दिलेली आहे
एक नगरपरिषदे गणपती उपक्रम राबत्वण्यासाठीत् नगरपरिषदेचे पदाधिकारी नगरसेवक महसूल व पोलीस प्रशासन अधिकारी मंडल अधिकारी व नगरपरिषद व्यवसाय कर विभाग प्रमुख यांनी मंडळांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मतपरिवर्तन केले आहे त्यामुळे मलकापूर शहरांमध्ये हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून इतर शहरांसाठी उदाहरण आहे नगर परिषद नगराध्यक्षा नीलम येडगे मनोहर शिंदे बांधकाम सभापती राजेंद्र थोरात विरोधी पक्षनेते सर्व नगरसेवकांनी हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केले असून शहरातील सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन यशस्वी होण्यासाठी मंडळांनी प्रबोधन केले आहे सदरच्या उपक्रमामुळे साखळी खंडित होणार असून त्यामुळे नियंत्रण ठेवता येणार आहेयाची पूर्ण नगराध्यक्षा नीलम येडगे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी यांची पूर्ण माहिती दिली