योद्धा शेतकरी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद अलियास जोशुआ सरदेसाई- मुंबई आणि योद्धा शेतकरी परिषदेचे प्रमुख सल्लागार श्री. सुनील तात्या काटकर यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्याला सेंद्रिय राज्य बनवण्याबाबत विचार करावा आणि स्व.श्री.शरद अनंत जोशी संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटनेला भारतरत्न देण्याबाबत विचार करावा अशी विनंती केली. यावेळी राजेंद्र भानुदास पाटील साहेबराव पाटील, राजू शेळके स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सातारा, रमेश पिसाळ, विशाल गायकवाड, विकास जाधव जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना सातारा, दत्ता मोरे, हृदयनाथ पार्टे, जवाहर पवार, नारायण शेंडगे, अर्जुन साळुंखे आदी सर्वजण उपस्थित होते.