स्थानिक नागरिकांनी रस्ते वाहतूकी बाबत प्रश्न उपस्थित केला.
दिनांक 25: रोजी सातारा – लोणंद रस्त्याला असणारे वाढे गावाच्या नजीक ऑईल मिल परिसरात तीव्र वळणावर साय. साडेचार च्या सुमारास माल वाहतूक करणारी पिक अप गाडी व क्रेनची समोरा समोर अपघात झाला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा 2 तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.
मंगळवार दिनांक 25 रोजी सायंकाळी साडेचार वाजता वाढे गावानजीक ऑईल मिल जवळ पिक अप गाडी सातारच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे क्रेनला समोरा समोर अपघात झाला. अपघात झालेल्या गाडीमध्ये चालक व 10 वर्षाचा लहान मुलगा होता. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु साडेचार च्या सुमारास नोकरदार मंडळीची घरी जाण्याची वेळ असते. त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याने नाहक त्रास झाला. वाढे गावानजीक असणाऱ्या रस्त्याला तीव्र वळण असल्याने वारंवार अपघात होतात. यानिमित्ताने पुन्हा एकदा सातारा लोणंद रस्ता जोखमीचा व धोकादायक होत आहे हे सिद्ध होत आहे.