पोलीसांच्या खाबुगिरीने मटका सुरू असल्याची चर्चा
जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
नागठाणे-प्रतिनिधी
बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावात सध्या मटका”ओपन”पणे सुरू असून पोलीसांच्या वाढत्या खाबुगिरीने हे सर्व अवैध धंदे चालू असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांच्यात आहे
पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्यापारी दृष्टीने सधनशील असलेल्या व सर्व सुविधा उपलब्ध असलेली अनेक गावे आहेत या गावात व्यवसायिक उलाढाल मोठी चाललेली असते पण गेल्या काही वर्षापासून बंद झालेला मटका पुन्हा राजरोसपणे ओपन होऊन मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटका बहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे
नागरिकांच्या तक्रारीनुसर मटका राजरोसपणे सुरू असताना पोलीस किरकोळ कारवाई करत असतात व पुन्हा 4 दिवसांनी मटका पुन्हा चालू होतो पण पोलीस कायमस्वरूपी मटका बंदची कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे
बोरगाव पोलीस स्टेशनच्या कारभार्यांच्या अक्ष्यम दुर्लक्षापणामुळे आज अनेकांचे संसार सुरू असलेल्या मटक्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. असे असतानांही कुठल्याही प्रकारचे अंकुश अवैध व्यवसायावर लावण्यात येत नसल्याचे दिसत आहे.
काही वर्षांपूर्वीही मटक्याला असेच पेव फुटले होते पण मटका एजंट वरील वारवार झालेल्या कारवाई मुळे मटका “क्लोज” झाला होता पण आता पुन्हा क्लोज झालेला मटका आता पुन्हा “ओपन”होऊन ओपन व छुप्या पद्धतीने मटका सुरू झालेला आहे.राजरोसपणे सुरू असलेल्या मटक्याची साधी भनक सुध्दा पोलीसांना कशी लागत नाही अशी चर्चा परिसरातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत त्यामुळे आता सातारा जिल्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणारे मटका व्यवसाय व्यवसाय कायमस्वरूपी क्लोज करावेत व पोलिसांच्या खाबुगिरीला ही आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे