महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
मुंबई, – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५१४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५१४ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल
■ व्हॉट्सॲप- १९७ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – २१४ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ११ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६० गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.
■ १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
अकोला जिल्ह्यातील बशीरतकाली पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद
बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या २ वर गेली आहे.
■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात जातीय टिपणीचा मजकूर असणारी पोस्ट केले होते व त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
महाराष्ट्र सायबरचे आवाहन
सध्याच्या काळात बरेच लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक हे ऑनलाईन विविध अँपद्वारे औषध मागवत आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि अशा अँपद्वारे औषध मागविण्याआधी, सदर अँप वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करा व मगच वापरा ,तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर स्टोर करू नका . तसेच सदर अँपवरून मागविलेली औषध डिलिव्हरी द्यायला घरी येतील तेव्हा तुम्ही मागविलेली औषध व डिलिव्हरीसाठी आलेली औषध एकच आहे याची खात्री करा, शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा.