नीरा :
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे काल दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (वय ४१) याच्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. प्रत्यक्ष दर्शंनी नाव उघड न करण्याच्या अटीवर गोळीबार झाल्याची खात्री दिली आहे. नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस व जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
काल शुक्रवारी सायंकाळी सात वाजता नीरा येथील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील एसटी स्टँड नजीक गुंड गणेश विठ्ठल रासकर हा पल्सर गाडीवर आला होता. त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून दोन गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात खोलवर जखम झाली आहे. त्याला प्रथम नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच जखमी रासकार मृत आल्याचे सांगितले जात आहे. पुढिल सोपस्करासाठी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करीत आहेत.