बोरगाव पोलीसाच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक
नागठाणे/प्रतिनिधी
पाडळी ता.जि. सातारा गावातील वेताळ माळ वस्तीवरील नागठाणे ते मांडवे जाणारे रस्त्यालगत असलेले सिध्दीविनायक गणेश मंदीरामधील दानपेटीचे कुलुप तोडुन रोख रक्कम अज्ञात आरोपी चोरट्यांनी लांबवले अशी तक्रार अधिक बाळासो ढाणे रा . पाडळी ता.जि. सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाणेस तक्रार दाखल केली होती
पण गुन्ह्यातील आरोपी हे चोरी करुन जात असताना पोलीसांना रात्रगस्त दरम्यान ३ आरोपींच्या हालचाली संशयीतरित्या दिसून आल्याने त्यांना जागीच पकडुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मौजे पाडळी ता.जि. सातारा येथील सिध्दीविनायक गणेश मंदीरामधील दानपेटीचे कुलुप तोडुन चोरी केली असलेची कबुली देवुन त्यांचे ताब्यातुन मंदीर चोरीतील ४८,१४८ / – रु . रोख रक्कम जप्त करणेत आली होती सदरचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पार पडलेनंतर फिर्यादी अधिक बाळासो ढाणे रा.पाडळी ता.जि. सातारा यांना परत करणेत आला आहे
सदरची कारवाई मा.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा , मा . बापु बांगर , अपर पोलीस अधीक्षक , सातारा , मा . किरणकुमार सुर्यवंशी , पोलीस उपअधीक्षक , सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र तेलतुंबडे , सहा . पोलीस निरीक्षक , पो.हे. कॉ .सावंत ,कारकुन म.पो.ना. नम्रता जाधव यांनी केली असून बोरगाव पोलीसांच्या कामाचे कौतुक होत आहे






















