नागठाणे ( प्रतिनिधी ) बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी गस्तीदरम्यान पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे ( ता . सातारा ) येथील चौकात सराईत गुन्हेगार संभाजी बबन जाधव ( रा . अतित ता . सातारा ) याला पकडून , त्याच्याकडील चोरीची दुचाकी
जप्त केली संभाजी जाधव हा कराडकडून सातारच्या दिशेने दुचाकीवरून जाताना दिसला .
त्याचा संशय आल्याने पोलीस कॉन्स्टेबल जानकर यांनी त्याला थांबवले
त्याच्याकडील स्कूटरची कागदपत्रे मागितली असता , ही गाडी साताऱ्यातील विसावा पार्क येथून चोरल्याचे त्याने सांगितले . त्याला पुढील तपासासाठी सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण शिंदे , पोलीस नाईक दादा स्वामी विशाल जाधव , बाळासाहेब जानकर यांनी ही कारवाई केली.




















