फलटण प्रतिनिधी
खामगाव ता फलटण येथील श्री स्वामी समर्थ नगर या ठिकाणी स्वयंभू श्री दत्त मंदिर मंडळ व्याच्यावतीने दि 3 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
दि 3 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त स्वयंभू श्री दत्त मंदिर येथे पहाटे ५ वाजल्यापासून श्रींचा अभिषेक,, महापूजा, माधुकरी, दत्तयाग होमहवन, भजन महाआरती, नामजप असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवत या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ९४ रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केल्याची माहिती मंडळाचे महंत उमेशानंद सरस्वती महाराज यांनी दिली तसेच मंडळातर्फे खराडेवाडी येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते गुरु पौर्णिमेनिमित्त दुपारी बारा ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी गुरु पूर्णिमा उत्सवास भाविक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती






















