महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :
मौजे वहागांव तालुका कराड येथे ग्रामपंचायत मार्फत घेण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गौरी गणपती सजावटीस महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
ग्रामपंचायतने केलेल्या आवाहनास साद देत महिलांनी प्लास्टिक पूनरवापर, झाडे लावा वसुंधरा वाचवा, साक्षरता वाढवा, चांद्रयान प्रतिकृती, पौष्टिक आहार, कुपोषण मुक्त भारत इत्यादी सामाजिक संदेश देणारी सजावट केली
यामध्ये सुरेखा जामदार, प्रियांका माने, पुष्पा चव्हाण, बाळकृष्ण पवार, शोभा पवार, सोमनाथ कुंभार, रुपाली नलवडे, संपत पवार, अर्चना पवार, अश्विनी पवार, सीमा पवार, बापूराव पवार, बाबु पवार, शामराव देशमुख, शंकर देशमुख, भिकाजी सुतार, रोहिणी नलवडे, शशिकांत पवार, छाया पुजारी, सुजाता पुजारी इत्यादीनी सहभाग घेतला
पर्यावरण संवर्धन जागृती साठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे सरपंच संग्राम पवार यांनी सांगितले. सरपंच संग्राम पवार,
उपसरपंच सुजाता पुजारी, आनंदी पवार, शिला पवार, रंजना पवार, धनंजय पवार, संतोष कोळी, हणमंत शिंदे, तुषार पवार, वनिता ताटे,स्वप्नाली पवार ग्रामविकास अधिकारी नामदेव चोरगे यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला होता.