महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (अनिल गायकवाड)
सातारा, दि. २८ मार्च : सातारा तालुक्यातील पंचायत समिती कार्यक्षेत्रातील एकागावामध्ये रमाई घरकुल व शौचालये बांधुन दोन ते तीन वर्षे झाली तरी सदर लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन योजनेतून शौचालयाासाठी देण्यात येणारे १२ हजारांचे अनुदान सदर लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप ही वर्ग करण्यात आलेली नाही. तरी या प्रकरणी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी याप्रकरणी चौकशी करुन याप्रकरणी दिरंगाई करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, भारत सरकार कडून स्वच्छ भारत मिशन ही योजना जोरात राबविण्यात येत आहे. या योजनेत हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून १२ हजारांचे अनुदान देण्यात येते. सदर योजनेत सातारा जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. परंतु याच जिल्ह्यात या योजनेतील लाभार्थी गेली दोन-तीन वर्षे शौचालय बांधून अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. तालुक्यातील एका गावात जवळ-जवळ चार ते पाच लाभार्थी अनुदानापासून वंचीत आहेत त्यांनी बांधलेल्या रमाई घरकुलावरील फलकावर रमाई साठी १,२०,०००/- तर स्वच्छ भारत योजनेच्या शौचालयासाठी १२००० /- रुपये असा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु सदर लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदानच मिळालेले नाही. मग हे अनुदान गेले कोठे ? स्वच्छ भारत मिशन योजनेत शौचालयाचे माहिती फोटो लाभार्थी यांची माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक असून याकामी ग्रामपंचायत स्तरावर दिरंगाई केली जात आहे. सदर कामातील कर्मचारी माझी वसुधंरा अभियानाचे काम आहे असे सांगून शौचालयांचे फोटो अप्लोड करण्यास वेळे नसल्याचे कर्मचार्यांकडून सांगितले जात आहे.
- या संदर्भात बीडीओशीं संपर्क साधला असता, ३१ मार्च पूर्वी परिपुर्ण प्रस्ताव सादर केल्यास सदर अनुदानाची रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या थेट खात्यावर पाठवण्यात येईल. ग्रामविकास अधिकारी व संगणक ऑपरेटर यांनी वंचीत पात्र लाभार्थ्यांचे शौैचालयाचे फोटो संबंधीत साईटवर तात्काळ ऑनलाईन अप्लोड करावे. सदर कामात दिरंगाई करणार्या कर्मचार्यावर कारवाई करणार
- सुवर्णा चव्हाण
गटविकास अधिकारी पंचायत समिती सातारा