महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :
भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्टात त्यांचा निषेध विविध पत्रकार संघटनेच्या वतीने होत असतानाच अखिल मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाच्या वतीने देखील चंद्रशेखर बावनकुळे यांचा नुकताच निषेध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र मध्ये ठिकठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध करण्यात येत आहे . त्याच पार्श्वभूमीवर आज कराडमध्ये बावनकुळे यांचा निषेध करण्यात आला.
तसेच बावनकुळे हे कराड दौऱ्यावर यापुढे केव्हाही येतील त्यावेळी त्यांनी पत्रकारांबाबत केलेल्या या अपमानकारक वक्तव्याबाबत त्यांना याठिकाणी रोखठोक जाब विचारण्यात येईल असा निर्धारही यावेळी कराडच्या पत्रकारांच्या वतीने करण्यात आला
यावेळी अखिल मराठी पत्रकार संघाच्ये जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोवेकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा त्यांना या सर्व गोष्टींचा जाब द्यावे लागेल असे आव्हान केले.
यावेळी अखिल मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोवेकर, सचिव अतुल होनकळसे ,कार्याध्यक्ष दिनकर थोरात, कराड शहर अध्यक्ष सौ प्रगती पिसाळ, उपाध्यक्ष सुहास पाटील, हारुण मुलाणी ,विकास साळुंखे, प्रकाश पिसाळ, तालुक्याचे पदाधिकारी कैलास थोरवडे, सागर दंडवते ,आदी उपस्थित होते.






















